Know Your bank

आपली बँक जाणा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांसाठी लागू केलेले FSWM(Financially Sound and Well Managed)म्हणजेच आर्थिकदृष्या सक्षम व उत्तम व्यवस्थापन निकषांच्या पूर्तते संदर्भात आपल्या बँकेची उल्लेखनीय‍ स्थिती जाणून घ्या.

अक्र

तपशील

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निकष

बँकेची 31.03.2017 रोजीची स्थिती

1.

 

CRAR (Capital to Risk Weighted Assets Ratio) भांडवल पर्याप्तता बँकेच्या स्वनिधीचे मालमत्तेच्या (कर्ज, गुंतवणूक इ.)  जोखमीशी प्रमाण

सातत्याने कमीत कमी 10% आवश्यक

सातत्याने गेली काही  वर्षे (2012 पासून ) 17% पेक्षा जास्त दि.31/03/2017 रोजी 19.69%

2.

Gross NPA(Non Performing Assets)ढोबळ अनुत्पादित (थकित) कर्जाच्या येणेबाकीचे एकूण कर्जाशी प्रमाण

 

Net NPA निव्वळ अनुत्पादित कर्ज अनुत्पादित कर्जाच्या येणेबाकीच्या रक्कमेची बँकेच्या नफयातून केलेली तरतूद वजा केल्यावर येणा-या रक्कमेचे एकूण कर्जाशी प्रमाण

7% पेक्षा कमी असणे आवश्यक.

 

 

 

3% पेक्षा जास्त नसावा

सातत्याने गेली काही  वर्षे 4.00 % पेक्षा कमी दि.31/03/2017 रोजी 3.82%

 

सातत्याने गेली 9 वर्षे 0%

दि.31/03/2017 रोजी 0.25%

3.

Net Profit - निव्वळ नफा

मागिल सलग 3 आर्थिक वर्ष बँकेला निव्वळ नफा असणे आवश्यक

दि.31.03.2017 व पूर्वी सलग 3 वर्ष निव्वळ नफा रु.2.50 कोटीपेक्षा जास्त आहे.

दि.31/03/2017 रोजी चा नफा रु.3.01 कोटी

4.

CRR ( Cash Reserve Ratio) - रोकड राखीव रक्कमेचे प्रमाण सहज उपलब्ध होईल अशा रोकड रक्कमेचे बॅकेच्या एकूण ठेवी व इतर देय रक्कमेशी कायदयानुसार आवश्यक प्रमाण

SLR ( Statutory Liquidity Ratio) वैधानिक गुंतवणूकीचे प्रमाण कायदयानुसार अवश्यक गुंतवणूकीचे बँकेच्या ठेवी व इतर देय रक्कमेशी प्रमाण

बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, 1949 नुसार वेळोवेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने जारी केलेल्या निकषांची सतत पूर्तता आवश्यक दि.07/1/2017 पासून CRR -4%   SLR -20.50%

CRR व SLR  बाबत सदोदित आवश्यक पूर्तता असते.

5.

प्रभावी अंतर्गत नियंत्रण व्यावस्था तसेच किमान 2 तज्ञ संचालक मंडळात सहभाग

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या मार्गदर्शक तत्वानुसार चार्टड अकौंटंट अथवा कायदा , बँकिंग, वित्त क्षेत्रातील प्रशिक्षित व अनुभवी किमान 2 तज्ञ व्यक्तिंचा संचालक मंडळात सहभाग अवश्यक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या मार्गदर्शक तत्वानुसार  2 तज्ञ संचालकांचा संचालक मंडळात सहभाग आहे.

 

6.

Core Banking संगणक प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित

Core Banking संगणक प्रणाली बँकेत कार्यान्वित असावी

Core Banking संगणक प्रणाली कार्यान्वित केली असून सर्व शाखांचा त्यात समावेश आहे.

7.

बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, 1949 मधील नियम व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आदेश, मार्गदर्शक तत्वे यांचे पालन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने वेळोवेळी जारी केलेले नियम व आदेशांचे पालन करण्यात कसूर नसावी.

बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, 1949 मधिल नियम व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या आदेश व मार्गदर्शक तत्वांचे

सदैव काटेकोरपणे तंतोतंत पालन करण्यात येते.

8.

बँकेवर कोणत्याही प्रकारची नोटिस अथवा दंडात्मक कार्यवाही

मागिल 2 वर्षात बँकेवर कोणत्याही प्रकारची नोटिस अथवा दंडात्मक कार्यवाही केलेली नाही

बँकेवर कोणत्याही प्रकारची नोटिस अथवा दंडात्मक कार्यवाही झालेली नाही.